हतगड किल्ल्याच्या धोकादायक रस्त्याला संपूर्ण ठिकाणी पर्यटकांच्या संरक्षणसाठी स्टील रेलिंग बसविणे अपेक्षित, नागरिकांत चर्चा
हतगड प्रतिनिधी _लक्ष्मण पवार

हतगड किल्ल्याच्या धोकादायक रस्त्याला संपूर्ण ठिकाणी पर्यटकांच्या संरक्षणसाठी स्टील रेलिंग बसविणे अपेक्षित, नागरिकांत चर्चा
सुरगाणा तालुक्यातील हतगड किल्ल्याचे काम आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण, योजना प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन. 2012-22 ,कामाची किंमत रु. 300.00 लक्ष , कामाचे नाव. हतगड किल्ला येथे पोहोच रस्ता करणे, पथदीप बसविणे, व परिसर सुशोभीकरण करणे, इ. या पैकी किल्ल्यावर जाणारा रस्ता अरुंद आणि खोल दरी असलेल्या ठिकाणी मजबूत स्टील रेलिंगची आवश्यकता आहे.यामुळे पावसाळ्यात होणारी घसरण आणि रस्त्याचे धोकादायक वळण व उतार भाग यावर नियंत्रण किल्ल्यावरील पर्यटनाला चालना देतांना पर्यटकांच्या सुरक्षितेला प्रथम प्राधान्य देणे प्रशासनाला अपेक्षित आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षण रेलिंग नसल्यामुळे होणारे अपघात कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. परंतु हतगड किल्ल्यावर जाणारा रस्ता पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी दुर्गम किल्ल्यावरील धोकादायक रस्ता मार्गांवर ठीक ठिकाणी स्टील रेलिंग उभारण्यात येत आहे. परंतु ते ठीक ठिकाणी न करता संपूर्ण रस्ता धोकादायक असल्याने संपूर्ण रस्त्याला स्टील रेलिंग बसविणे अपेक्षित आहे. यामुळे अपघाताची शक्यता कमी होऊन पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.अशी चर्चा नागरिकांत होत आहे. तरी प्रशासनाने व ठेकेदारने दखल घेत संपूर्ण धोकादायक किल्याच्या रस्त्याला स्टील रेलिंग करण्यात यावी.असे नागरिकांत बोलले जात आहे.

