सुरगाण्यातील कन्या आश्रमशाळेच्या कबड्डी संघाची राज्यस्तरावर भरारी
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

बोरपाडा शाळेच्या कबड्डी संघ राज्यस्तरावर
बोरगाव : लक्ष्मण बागुल
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा झाली. यात बोरपाडा येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या १४ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला.
विभागीय स्पर्धेत संघाने आक्रमक खेळाचे दर्शन घडवत विजय मिळवला. या यशाबद्दल विभागीय अप्पर आयुक्त दिनकर पावरा, कळवण प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. विद्यार्थिनींनी केलेल्या कामगिरीमुळे शाळेसह प्रकल्पाचे नाव विभागस्तरावर उज्ज्वल झाले. याबद्दल मुख्याध्यापक अमोल जोपळे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. संघ व्यवस्थापक कौशिक भोये, क्रीडा शिक्षिका सुनंदा जाधव व प्रशिक्षक राहुल पगार यांनी संघास मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचा शिक्षिका सुनंदा वाडेकर व चंद्रकांत चौधरी यांनी सत्कार केला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास वार्डे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचा गौरव केला. या यशाबद्दल शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. संघातील जयवंती दळवी, रोहिणी पवार, गौरी दळवी, वैशाली देशमुख, माधुरी मिसाळ, ललिता पाडवी, प्रियंका गवळी, नयना खांबाईत, निशा गावित, कीर्ती पालवी, लावन्या जाधव, सोनाली पवार या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत राज्यस्तरावर निवड झाली.



