*सुरगाणा येथे संपूर्णता अभियान सन्मान समारोह उत्साहात संपन्न*
आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी घोटूळ गावाजवळील मोकळे मैदान येथे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियान सन्मान समारोह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तालुक्यात विविध विकास निर्देशांकांमध्ये संतृप्ती साध्य करणाऱ्या विभाग, अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नाशिक हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मा.देवदत्त केकान,अतिरिक्त जिल्हाधिकारी. कश्मिरा संख्ये, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कळवण, रामजी राठोड (तहसीलदार), जगन सूर्यवंशी (गटविकास अधिकारी), बाळासाहेब खेडकर (सहाय्यक गटविकास अधिकारी), डॉ. दिलीप रणवीर (तालुका आरोग्य अधिकारी), मंगेश निकम (ABP Fellow), संजय कोंडार (महिला व बाल विकास अधिकारी), अल्पा देशमुख (गट शिक्षण अधिकारी),विवेकानंद निकम (पाणीपुरवठा अभियंता), डॉ. सुभाष हिंगे, डॉ. नरेंद्र भागवत (पशुसंवर्धन विभाग), गणेश महाले (उमेद) यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान आरोग्य, महिला व बाल विकास, कृषी, शिक्षण, पशुसंवर्धन व उमेद अभियान यातील संपूर्णता अभियान जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान झालेल्या संपूर्णता अभियान मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच स्वयं सहाय्यता बचत गट प्रतिनिधी सर्वांचा प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
सुरगाणा तालुक्यात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विकास निर्देशांकांमध्ये लक्षणीय प्रगती साध्य झाल्याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले व पुढील काळातही समन्वयातून कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमा दरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी शुभम बैरागी आणि अभिजीत कोशिरे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंगेश निकम (ABP Fellow) यांनी केले
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.