मेघाश्रयने घडवल अतिदुर्गम ठाणगाव येथील विद्यार्थ्यांना मुंबई दर्शन*
ठाणगाव प्रतिनिधी मनोज वैद्य

*मेघाश्रयने घडवल अतिदुर्गम ठाणगाव येथील विद्यार्थ्यांना मुंबई दर्शन*
शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या “मेघाश्रय” या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सीमा सिंग यांच्या पुढाकाराने नासिक जिल्ह्यातील ठाणगाव ता. सुरगाणा येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयातील 80 आदिवासी मुलांना मुंबई व परिसरात सहलीसाठी आणण्यात आले.
डोंगराळ व अतिदुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना मुंबईतील विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळे दाखवण्यात आली तसेच पर्यावरण, विज्ञान, भूगोल आदी विषयांवर माहिती देण्यात आली. सीमा सिंग यांनी विद्यार्थ्यांना देशासाठी काहीतरी करण्यास प्रोत्साहित केले. पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासारखे होते. मुंबईतील अनेक दृश्ये पाहून मुले आनंदित झाली. सिंग यांनी सर्व मुलांना भेटवस्तू दिल्या. तसेच विद्यालयाच्या वतीने आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेली लाल फडकी तसेच बांबूपासून बनवलेल्या काही वस्तू व वारली पेंटिंग सिंग यांना भेट देण्यात आल्या. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक निकम, ज्येष्ठ शिक्षक वामन महाले, मनोज वैद्य, बाळकृष्ण बोरसे दिलीप महाले आदी उपस्थित होते.



