
कळवण प्रकल्पाधिकारी अकुनुरी नरेश यांची बदली
आदिवासी विकास अंतर्गत येणाऱ्या कळवण आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांची बदली झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अनुष्का दळवी यांनी याबाबत आदेश पारीत केला आहे. त्यानुसार त्यांची नियुक्ती चंद्रपूर महापालिकेच्या आयुक्तपदी निवड झाली आहे. विद्यमान आयुक्त विद्या गायकवाड यांच्या जागेवर ते रुजू होतील.



