# माणकेश्वर फाउंडेशन माणी आयोजित मानकेश्वर फेस्टिवल सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा….!* – आवाज जनतेचा
विशेष वृतान्त

माणकेश्वर फाउंडेशन माणी आयोजित मानकेश्वर फेस्टिवल सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा….!*

*माणकेश्वर फाउंडेशन मानी आयोजित मानकेश्वर फेस्टिवल सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा….!*¢

दि. 10 जाने 2026 योजी मानी येथे माणकेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून गावचे लोकनियुक्त सरपंच -सौ.कमलताई चौधरी पोलीस पाटील श्री.नारायण गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरवात झाली.
कार्यक्रम प्रमुख आकर्षित म्हणून
आदिवासी भागातील परिस्तिथी दर्शवणारी *रांझाळ बेब सिरिजचे* लेखक दिग्दर्शक *अनिल एकनाथ जाधव* ,पेठ तालुक्यातील प्रसिद्ध आदिवासी कलाकार मिमिक्री आर्टिस्ट राजेंद्र गांगोडे
तसेच युट्युब स्टार रुतिका महाले, कनक हिंडे, ओम चौधरी व हर्षद पवार हे युट्युब कलाकारसंस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश भाऊ वाघमारे हे होते. संस्थेचे उपाध्यक्ष कमलेश चौधरी, खजिनदार योगेश गायकवाड, सचिव रमेश चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी संस्थेचे सदस्य भास्कर गांगुर्डे, अशोक गायकवाड,राजेश चौधरी, चंद्रकांत चौधरी, मनोज बठाले, हरी माळी, दीपक माळघरे, गणेश चौधरी, हेमंत मोरे, भागवत पवार, अशोक भोये सर, भास्कर ब्राह्मणे, ललित धूम, कांतीलाल मोरे, रामभाऊ थोरात, देविदास चौधरी, धर्मराज महाले, कांतीलाल नाठे, हेमंत भुसारे, मिथुन चौधरी, कुमार वाघमारे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना महाराष्ट्र राज्यध्यक्ष श्री. चेतन खांबाईत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सामाजिक एकोपा, युवकांचे संघटन आणि ग्रामीण भागातील विकासासाठी संघटनांचे योगदान यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकजुटीने काम केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रम सूत्रसंचालन भास्कर ब्राम्हणे व रामभाऊ थोरात यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!