# आग्र-नारी महिला असोसिएशन तर्फे विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप.. – आवाज जनतेचा
आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

आग्र-नारी महिला असोसिएशन तर्फे विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप..

आग्र-नारी महिला असोसिएशन तर्फे विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप..

समाजसेवी शिक्षक बलराम माचरेकर यांच्या प्रयत्नातून इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या वाघेरे केंद्रातील दराणेवाडी,कानडवाडी, मालुंजेवाडी व समनेरे येथील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल व शैक्षणिक साहित्य वह्या पेन ,पेन्सिल, खाऊचे वाटप त्याचबरोबर कानडवाडी येथील महिलांना हळदीकुंकू निमित्ताने डब्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अग्रणारी महिला असोसिएशन च्या अध्यक्ष शशी अग्रवाल, करुणा अग्रवाल, कविता अग्रवाल,सीमा सिंघानिया, संगीता ओम, क्रिष्णा अग्रवाल ,संजय शिंपी त्याचबरोबर इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती सोमनाथ जोशी ,लक्ष्मी नगर येथील सरपंच सावित्रीताई जोशी ,अरुण भामरे, विजय जाधव, राधिका क्षीरसागर, अनिता गवळी ,वृषाली आहेर रूपाली धोंगडे उपस्थित होते .
अग्रणारी महिला असोसिएशन तर्फे हळदी कुंकूचा देखील कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने घेण्यात घेण्यात आला. गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सर्व यावेळी सर्व मुलांच्या व महिलांना अतिशय आनंद झाला होता कारण नाशिक येथील सामाजिक संस्थेमार्फत अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे ग्रामस्थांनी देखील यावेळी धन्यवाद व्यक्त केलं आणि पंचायत समितीचे माजी सभापती सोमनाथ जोशी यांनी देखील संस्थेचा व बलराम माचरेकर यांचा विशेष आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराम माचरेकर यांनी केले व आभार दराणेवाडी शाळेचे मुख्याध्यापक विजय जाधव यांनी मानले.
__________
फोटो..
कानडवाडी येथे अग्रणारी महिला असोसिएशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल व शैक्षणिक साहित्य वाटप करताना संस्थेच्या अध्यक्ष शशी अग्रवाल, करूणा, अग्रवाल कविता अग्रवाल, पंचायत समिती माजी सभापती सोमनाथ, समाजसेवी शिक्षक बलराम माचरेकर, दराणेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय जाधव ,अरुण भामरे, राधिका क्षीरसागर, अनिता गवळी आदि.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!