# साजोळे ग्रामपंचायतीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचा गृहप्रवेश – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

साजोळे ग्रामपंचायतीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचा गृहप्रवेश

साजोळे ग्रामपंचायतीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचा गृहप्रवेश

ग्रामपंचायत साजोळे येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा क्रमांक दोन अंतर्गत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पार पडला.
या कार्यक्रमास उपसरपंच पुष्पा गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर गायकवाड, सविता भोये, सिताराम वाघमारे, मंगल दळवी, पांडुरंग राऊत, रामदास गावित, दत्तू गावित, कमल चव्हाण यांच्यासह घरकुल लाभार्थी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत अधिकारी वैशाली देवरे, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाभार्थ्यांना नव्या घरकुलांचा गृहप्रवेश मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शासनाच्या आवास योजनेमुळे गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळत असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!