# दिव–दमण येथील विदेशी मद्याची वाहतूक उघड; चांदवड टोलनाक्यावर ८० लाखांचा मुद्देमाल जप्त – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

दिव–दमण येथील विदेशी मद्याची वाहतूक उघड; चांदवड टोलनाक्यावर ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

दिव–दमण येथील विदेशी मद्याची वाहतूक उघड; चांदवड टोलनाक्यावर ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

दादरा नगर हवेली व दिव–दमण येथे निर्मित आणि त्या राज्यातच विक्रीस अनुमत असलेल्या विदेशी मद्याची महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई केली. चांदवड तालुक्यातील मुंबई–आग्रा महामार्गावरील टोल नाक्यावर करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ८० लाख १० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक विभागीय भरारी पथकाने दि. २८ जानेवारी २०२६ रोजी मंगरुळ शिवारातील चांदवड टोल प्लाझा येथे वाहन तपासणी सापळा रचला असता संशयास्पद टाटा कंपनीचा सहाचाकी ट्रक (MH-48-CB-9908) अडविण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य आढळून आले.
या कारवाईत
३,४७४ बल्क लिटर विदेशी मद्य (३९७ बॉक्स) व
१,५२४ बल्क लिटर तीव्र बिअर (१२७ बॉक्स)
तसेच एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्र. १६/२०२६ नोंदविण्यात आला असून जगदीश बाबुलाल (वय २७, रा. सोनेडी, ता. सेडवा, जि. बाडमेर – राजस्थान) या वाहनचालकास अटक करण्यात आली आहे. संशयित मद्य पुरवठादार, खरेदीदार व वाहनमालकाचा शोध सुरू आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपआयुक्त सौ. उया वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश गौडा यांच्या पथकाने पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक किरण चिदळे करीत आहेत.
दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, विक्री अथवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-९९९९ किंवा व्हॉट्सॲप ८४२२००११३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!