
*प्रा डॉ.भागवत शंकर महाले यांची प्रोफेसर पदी निवड*
नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भागवत शंकर महाले यांची दिनांक 3 फेब्रुवारी रोजी विद्यापीठ येथील गेस्ट हाऊस येथे CAS अंतर्गत प्रोफेसर म्हणून अंतर्गत गुणवत्ता सिद्धता परीक्षण करून कमिटीने निकष पूर्ण केलेले असल्याने डॉ.भागवत शंकर महाले , असोसिएट प्रोफेसर या पदावरून आता परीक्षणातून “प्राध्यापक” पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी *प्राथमिक शिक्षक*, *केंद्र प्रमुख, * *विषयतज्ञ* , ते *”प्राध्यापक”* पदा पर्यन्त कामगिरी करत गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील विविध पैलूचे दर्शन दिलेले आहे संशोधन क्षेत्रात 56 शोधन निबंध, 3 पेटंट, 7 बुक पब्लिश झाले आहेत तर 12 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील काम सामाजिक , राजकीय क्षेत्रात देखील अनुभव राजकीय दृष्टीने घेण्यासाठी कळवण – (नाशिक) विधान सभा-2024 निवडणूक लढवली आहे. सामाजिक क्षेत्रात गरीब लोकांना आर्थिक मदत, आरोग्य तपासणी दवाखान्यात उपचार करणे, या सर्व क्षेत्रातील विचार करून चांगले गुणवत्ता असलेले प्राध्यापक म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे . तरी सर्व राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक यांनी त्यांचं अभिनंदन केलेले आहे. राष्ट्र विभागाचे डॉ. भागवत शंकर महाले हे गेले 17 वर्षापासून प्राध्यापक पदावर कार्यरत असून त्यांची पूर्वीची सेवा आठ वर्षे प्रायमरी टीचर म्हणून प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलेला आहे ते अतिशय हुशार , कुशाग्र बुद्धीचे कष्टाळू वृत्तीचे अशी व्यक्तिमत्व असून त्यांच्या कामांमध्ये कामांमध्ये सातत्य असल्याने प्रत्येक कामामध्ये ते यशस्वी होत आहेत. त्यांच्या यशस्वी कार्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे एडवोकेट नितीनजी ठाकरे सरचिटणीस नितीनजी ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. त्याचबरोबर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे पदाधिकारी पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष चिटणीस सभापती उपसभापती यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाचे शिक्षण शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके डॉ.भास्कर ढोके , शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव , शिक्षणाधिकारी व प्राचार्य डॉ विलास देशमुख, प्राचार्य ज्ञानेश्वर लोखंडे, प्राचार्य डॉ. किरण रकिबे, त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोपान कुशारे, प्राचार्य डॉ. सुरेश जाधव , प्राचार्य डॉ. महेश वाघ , डॉ. शरद कांबळे, प्रा. मनोज मगर, प्रा. योगेश मोहन, प्रा. डॉ. विठ्ठल सोनवणे, प्रा. संदीप गोसावी, प्रा. डॉ .संदीप निकम प्रा. हिरे, दादासाहेब गायकवाड, रतन चौधरी, प्रकाश चौधरी, आदींसह मित्र परिवार प्राध्यापक, नागरिकांनी अभिनंदन केले आहे.



