
भवाडा येथे एलआयटी–स्वदेस फाउंडेशनचा संयुक्त गावभेट कार्यक्रम
एलआयटी व स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज भवाडा गावात गावभेट (विजिट) कार्यक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी गोमाता गाव विकास समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ज्ञानमित्र, स्वदेस मित्र यांच्या सहभागातून स्वदेश या संकल्पनेनुसार स्थापन करण्यात आलेल्या राजधानी सुरगाणा शेतकरी कंपनीचे संचालक (डायरेक्टर)ही यावेळी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान गावातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतीविकासाच्या दृष्टीने मिरचीच्या प्लॉटवर प्रत्यक्ष भेट देऊन लागवड व उत्पादनाची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी, पुढील नियोजन व सहकार्याच्या शक्यतांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी पुढील उपक्रमांचे नियोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



