# उंबरठाण प्रीमियर लीग : अलंगुणच्या आदर्श इलेव्हनने विजेतेपदावर नाव कोरले – आवाज जनतेचा
विशेष वृतान्त

उंबरठाण प्रीमियर लीग : अलंगुणच्या आदर्श इलेव्हनने विजेतेपदावर नाव कोरले

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

उंबरठाण प्रीमियर लीग : अलंगुणच्या आदर्श इलेव्हनने विजेतेपदावर नाव कोरले

उंबरठाण येथे आयोजित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. सहा दिवस चाललेल्या या स्पर्धेत अलंगुण येथील आदर्श इलेव्हन संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला ५१ हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत झुंडीपाडा येथील वाघमारे किंग संघाने उपविजेतेपद मिळवत ३१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. वांगण (क) येथील गावित फायटर्स संघाने २१ हजार रुपयांचे बक्षीस मिळवत तृतीय क्रमांक तर उंबरठाण येथील संघाने २१ हजार रुपयांचे बक्षीस मिळवत चौथा क्रमांक मिळविला.
पोलिस उपनिरीक्षक रवींद्र खाडे, मनोज चव्हाण, गिरीश गायकवाड, शिवराम गावित व जिवा सहारे यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना ट्रॉफी व रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन पुंडलिक महाले, जयंतीलाल ठाकरे, गणेश वाघेरे, तुकाराम वाघमारे व गोरख गावित यांनी केले होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी उंबरठाण येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बेस्ट बॉलर म्हणून राजेश भोये, बेस्ट बॅट्समन व मॅन ऑफ द सिरीज म्हणून सतीश गाढवे यांना विशेष बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!