मार्च २०२९ पर्यंत सुरगाणाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
एलटीआय माईंडट्री फाउंडेशन, प्रथम इन्फोटेक फाउंडेशन व स्वदेस फाउंडेशन यांच्या सहयोगाने सुरगाणा तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रमाची आढावा बैठक आदरणीय आयुष प्रसाद (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी – नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
या बैठकीस एलटीआय माईंडट्री फाउंडेशनच्या ग्लोबल ESG हेड अर्चना सहाय, CSR मॅनेजर वसीम बागवान, स्वदेश फाउंडेशनचे CEO श मंगेश वांगे तसेच प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे ऑपरेशन्स लीड वैभव डिवरे उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेत मार्च २०२९ पर्यंत सुरगाणा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सामाजिक संस्था, CSR भागीदार व प्रशासनाने एकत्रितपणे शिक्षण, आरोग्य, उपजीविका, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व सामाजिक विकास क्षेत्रात प्रभावी काम करण्याचे आवाहन केले.
या विकासात्मक उपक्रमाची औपचारिक सुरुवात म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रथम इन्फोटेक फाउंडेशन व एलटीआय माईंडट्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या FLN (Foundational Literacy & Numeracy) व STEM शिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सुरगाणासारख्या आकांक्षित तालुक्याचा विकास शासन, सामाजिक संस्था व खाजगी भागीदार यांच्या संयुक्त सहभागातून घडवून आणण्याचा दृढ संकल्प जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला. मार्च २०२९ पर्यंत सुरगाणाला सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक आदर्श तालुका बनवण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.