# सुरगाणा तालुक्यात ‘विकास’च्या नावाखाली सरपंच–ठेकेदारांचा सत्तेचा गैरवापर; चौकशी व कारवाईची मागणी – आवाज जनतेचा
संपादकीय

सुरगाणा तालुक्यात ‘विकास’च्या नावाखाली सरपंच–ठेकेदारांचा सत्तेचा गैरवापर; चौकशी व कारवाईची मागणी

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा तालुक्यात ‘विकास’च्या नावाखाली सरपंच–ठेकेदारांचा सत्तेचा गैरवापर; चौकशी व कारवाईची मागणी

सुरगाणा तालुक्यात एकूण ६१ ग्रामपंचायती असून त्यापैकी काही ठिकाणी सरपंचच थेट किंवा अप्रत्यक्षपणे ठेकेदार म्हणून काम करत असल्याच्या गंभीर तक्रारी पुढे येत आहेत. विकासकामांच्या निविदा, अंदाजपत्रके व प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये आर्थिक फायदा स्वतःच्या खिशात कसा जाईल, याकडेच अधिक लक्ष दिले जात असल्याची चर्चा तालुकाभर सुरू आहे.
कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्यास राजकीय पक्षांचा वरदहस्त वापरून दबाव टाकला जात असल्याचेही बोलले जात आहे. नियम, पारदर्शकता व गुणवत्ता यांना डावलून विकासाच्या नावाखाली वैयक्तिक स्वार्थ साधला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामविकास खुंटत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.
या प्रकरणाची संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच निविदा व विकासकामांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सुरगाणा तालुक्यातील या कथित गैरप्रकारांमुळे प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!