शिवरात्री निमित्त वळण (मु) गावात ५२ जलचक्रींचे वाटप
महिलांकडून वेल्स ऑन विल्स संस्थेचे आभार
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वळण (मु.) गावात महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने Wells on Wheels (वेल्स ऑन विल्स) या संस्थेकडून गावातील महिलांना ५२ जलचक्रींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट मोठ्या प्रमाणात कमी होणार असून ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण आहे.
वळण हे डोंगराळ व दुर्गम भागात असल्यामुळे येथे पाण्याची समस्या वारंवार जाणवत असते. विशेषतः महिलांना लांब अंतरावरून डोक्यावर किंवा हातात पाणी आणावे लागत होते. जलचक्रीच्या माध्यमातून कमी श्रमात अधिक पाणी सहज वाहून नेणे शक्य होणार आहे.
कार्यक्रमावेळी ग्रामस्थ, महिला बचतगट सदस्य तसेच संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. गावकऱ्यांनी या उपयुक्त भेटीबद्दल संस्थेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. शिवरात्रीच्या निमित्ताने मिळालेली ही भेट महिलांसाठी दिलासा देणारी ठरली आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.