# शिंदे दिगर येथे आज महाशिवरात्री निमित्त यात्रा; हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित – आवाज जनतेचा
धार्मिक व आध्यात्मिक

शिंदे दिगर येथे आज महाशिवरात्री निमित्त यात्रा; हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

शिंदे दिगर येथे आज महाशिवरात्री निमित्त यात्रा; हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

आज (दि.१५) शिंदे दिगर येथे सालाबादप्रमाणे महाशिवरात्री निमित्ताने पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहणार असून धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त विविध खाऊ, खेळणी तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणारी ही यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र खाडे, उपनिरीक्षक मनोज कुवर, चेतन बागुल, जगदीश घुटे, मांगू भोये, अनिल चारोस्कर व रमेश चव्हाण यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यात्रेच्या आयोजनासाठी शिंदे दिगर येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून भाविकांनी शिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!