जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत बोरगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत बोरगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम
उपपीठ उत्तर महाराष्ट्र, नाशिक
यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान महाकुंभ २०२६ (दि. ४ ते १८ जानेवारी २०२६) अंतर्गत सुरगाणा तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
या उपक्रमाअंतर्गत सुरगाणा तालुक्यातील बोरगाव विभागात दि. १५ जानेवारी २०२६ रोजी बोरगाव येथे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
हे रक्तदान शिबिर सकाळी १०.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत चालले. शिबिराला तरुण, युवक-युवती तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात एकूण ८७ रक्तपिशव्या (ब्लड बॅग) संकलित करण्यात आल्या. रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये असलेली जागरूकता व सामाजिक बांधिलकी यावेळी प्रकर्षाने दिसून आली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका सेवा समिती, सुरगाणा तसेच सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि रक्तदात्यांनी मोलाचे सहकार्य केले.
जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत होत असलेली ही रक्तदान चळवळ समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याचे महत्त्वाचे कार्य या माध्यमातून घडत आहे.



