आपला जिल्हा
श्रीभूवन आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे श्रमदानातून समाजकार्य
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

श्रीभूवन आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे श्रमदानातून समाजकार्य
सुरगाणा तालुक्यातील आश्रम शाळा श्रीभूवन येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत श्रमदानातून श्रीभूवन ते बुबळी फाटा या रस्त्याची डागडुजी केली. विद्यार्थ्यांनी खड्डे भरून रस्ता सुरळीत करण्याचे काम उत्साहाने पार पाडले.
या उपक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वच्छता, रस्ते सुरक्षेचे महत्त्व तसेच सामाजिक जबाबदारी यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मिळून केलेल्या श्रमदानामुळे ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.
या वेळी आश्रम शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



