
कन्सरा माऊली–उन्हादेव यात्रा उत्सव उत्साहात संपन्न
कळवण तालुक्यातील गोधनपाणी निऱ्हळ, डोंगर जामले, दळवट परिसरातील आदिवासी समाजाचे कुलदैवत कन्सरा माऊली–उन्हादेव यात्रा, देवदिपाळी व भव्य आदिवासी मेळावा उत्साहात पार पडला. स्व. काशिनाथ गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या यात्रेचे आयोजन योगेश काशिनाथ गायकवाड व कुटुंबीयांनी केले.
कार्यक्रमाला खासदार भास्कर भगरे, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, माजी आमदार जे.पी. गावित यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यात्रेत विविध आदिवासी कलापथकांच्या सादरीकरणांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून परंपरा, संस्कृती आणि भक्तीचा उत्सव साजरा केला.


