# वणीत ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले वाचनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न – आवाज जनतेचा
विशेष वृतान्त

वणीत ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले वाचनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

वणी प्रतिनिधी सुरेश सुरासे

वणीत ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले वाचनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

 

दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी ग्रामपालिकेच्या पुढाकारातून व जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने गावात ज्ञानज्योती ‘सावित्रीमाई फुले वाचनालय’ सुरू करण्यात आले असून आज रोजी त्याचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्या स्मरणार्थ या वाचनालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात,वाचन संस्कृतीला चालना मिळावी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
उद्घाटनप्रसंगी ग्रामपालिकेचे पदाधिकारी,मान्यवर नागरिक, शिक्षकवृंद व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत या उपक्रमाचे कौतुक केले.
वाचनालयात विविध विषयांवरील पुस्तके,संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक साहित्य तसेच वर्तमानपत्रांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार असून वणी गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.कार्यक्रमाच्या उद्घाटनाला वणी गावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट,उपसरपंच विलास कड, कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूलचे मुख्याध्यापक धैर्यशील पाटील,ग्राम विकास अधिकारी संजय देशमुख,ज्येष्ठ नागरिक आबासाहेब देशमुख, पँथर रविकुमार सोनवणे, जगदंबा देवी मंदिर ट्रस्टचे सदस्य गणेश दादा देशमुख, अमोल देशमुख,संताजी शिक्षणं संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख,समता परिषदचे तालुका अध्यक्ष दुर्गेश चितोडे,ग्रामपालिका सदस्य राकेश थोरात,राहुल गांगुर्डे,जगन वाघ, राजश्री पारख,उज्वला धूम,कैलासधूम,नामदेव गवळी,संविधान गांगुर्डे,दुर्गेश ,जगन सताळे, अंगणवाडी सेविका,यांचेसह महिला व अभ्यासिकेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!