# भितबारी सापुतारा रस्त्यावर घागबारी येथे भीषण वाहतूक कोंडी; रुग्णवाहिका अडकली, प्रशासनावर टीका – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

भितबारी सापुतारा रस्त्यावर घागबारी येथे भीषण वाहतूक कोंडी; रुग्णवाहिका अडकली, प्रशासनावर टीका

हरणटेकडी प्रतिनिधी विष्णू बोरसे

भितबारी सापुतारा रस्त्यावर घागबारी येथे भीषण वाहतूक कोंडी; रुग्णवाहिका अडकली, प्रशासनावर टीका

सुरगाणा तालुक्यातील भितबारी–सापुतारा घागबारी येथे
मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरण व दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. अरुंद झालेला मार्ग, खोदकामामुळे तयार झालेले खोल चर आणि रस्त्याच्या कडेला टाकलेले मातीचे ढिगारे यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागली. अनेक प्रवासी रस्त्यात अडकून पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या कोंडीत एक रुग्णवाहिका देखील अडकली होती. आपत्कालीन सेवेसाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास मार्ग न मिळाल्याने काही काळ ती जागेवरच थांबून राहिली. त्यामुळे रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांनी प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. दोन्ही बाजूने वाहने पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होती. मोठे ट्रक, मालवाहू गाड्या, खासगी चारचाकी आणि दुचाकी यामुळे मार्ग पूर्णपणे ठप्प झाला. धुळीचे प्रमाण वाढल्याने आणि उखडलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या जिकिरीने प्रवास करावा लागत आहे.
सापुतारा परिसर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. अशा परिस्थितीत कामाचे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकते.
रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवांना प्राधान्याने मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!