
आंबोडे येथे होळी (शिमगा) सण मोठ्या उत्साहात साजरा
सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथे होळी (शिमगा) सण आदिवासी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बा-हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, आंबोडे गावचे भूमिपुत्र डॉ. हेमंत घांगळे व ग्रामस्थांनी एकत्र येत पारंपरिक विधीनुसार होळीची पूजा केली. होळीला नैवेद्य अर्पण करत सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते व डॉ. हेमंत घांगळे यांनी आदिवासी बांधवांना होळी सणाच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि परंपरांचे जतन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच राजेंद्र निकुळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात होळी (शिमगा) सण साजरा करण्यात आला.



