# सातबाभळ येथे स्वदेस फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिर; १०२ जणांची तपासणी. – आवाज जनतेचा
आरोग्य व शिक्षण

सातबाभळ येथे स्वदेस फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिर; १०२ जणांची तपासणी.

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सातबाभळ येथे स्वदेस फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिर; १०२ जणांची तपासणी.

सुरगाणा तालुक्यातील सातबाभळ भदर येथे स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र माणी येथील आरोग्य अधिकारी यांची टीम, एस.एम.बी.टी. हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर तसेच स्वदेस फाउंडेशनचे डॉक्टर उपस्थित राहून नागरिकांची तपासणी केली.
शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी व उपचार, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर मार्गदर्शन व उपचार, तसेच इतर आजारांची तपासणी करण्यात आली. याशिवाय ० ते १८ वयोगटातील मुलांच्या डोळे, हृदय, कान यांसारख्या आरोग्य समस्यांचीही विशेष तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिरामध्ये गावातील एकूण १०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजेनुसार रुग्णांना औषधे, गोळ्या तसेच चष्मे देण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!