# बुरड हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारातून रुग्णाला जीवदान – आवाज जनतेचा
आरोग्य व शिक्षण

बुरड हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारातून रुग्णाला जीवदान

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

बुरड हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारातून रुग्णाला जीवदान

 

वणी  येथील बुरड हॉस्पिटलमध्ये गेल्या १५ दिवसांपासून उपचार घेत असलेले मंगेश बोरसे (वय ४५, रा. डांगसौंदाने) यांना पूर्ण बरे होऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना **हिपॅटोरिनल सिंड्रोम (HRS)**, **सेप्टिक शॉक** आणि **हिपॅटिक एन्सेफलोपॅथी** सारख्या अत्यंत गंभीर आजारांची लागण झाली होती.

सुरुवातीला सदर रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथील उपचारांना काहीही प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले की, रुग्ण काही तास किंवा काही दिवसच जगू शकेल. शेवटचा पर्याय म्हणून नातेवाईकांनी दिंडोरी तालुक्यातील वणी येथील बुरड हॉस्पिटलमध्ये नेले.डॉ. **प्रतिक बुरड** यांच्या नेतृत्वाखाली तपासण्या करून उपचार सुरू करण्यात आले. दोनच दिवसांत काविळीच्या रिपोर्टमध्ये सुधारणा दिसून आली. टप्प्याटप्प्याने चाचण्यांमध्ये सकारात्मक प्रगती होत राहिली. सात दिवसांत रुग्ण हालचाल करू लागला, खाऊ लागला, उठून बसू लागला आणि व्यवस्थित बोलूही लागला. उपचार सुरू असताना रुग्ण पूर्णपणे टणक बरा झाला.
डॉ. प्रतिक बुरड, डॉ. प्रतिक शेलार आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे हा चमत्कार घडल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. डिस्चार्जच्या वेळी रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टर व टीमचे भरलेल्या डोळ्यांनी आभार मानले.

यापुर्वी दुर्मिळ व गंभिर अवस्थेतील रुग्नांना डॉ. बुरड यांनी उपचार करित जीवनदान दिले असल्याची अनेक उदा. आहेत. ही घटना ग्रामीण भागातील गंभीर आजारांवरही प्रभावी उपचार शक्य असल्याचे दर्शवते. वणी सारख्या ग्रामिण भागात बुरड हॉस्पिटल हे रुग्नासाठीची जीवदायीनीच ठरत असल्याने अल्प दरात सर्वोत्तम आरोग्य सेेेवा देणारे हॉस्पिटल म्हणुन प्रसिद्ध होत आहे.

**डॉ. प्रतिक बुरड** म्हणाले,
“सदर रुग्ण अगदी अत्यंत गंभीर स्थितीत आमच्या रुग्णालयात दाखल झाले होते. नाशिकहून रुग्णाला काढून दिल्याने प्रारंभी मलाही शंका होती. परंतु माझे वैद्यकीय ज्ञान व अनुभवाच्या कौशल्याला पणाला लावले. त्याचाच हा परिणाम आहे की, सदर रुग्ण अगदी ठणठणीत बरा होऊन सुखरूप घरी गेल्याने मलाही आनंद आहे. हा एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. या चमत्कारासाठी परमेश्वरांने माझी निवड केली, मला ही संधी परमेश्वराने दिली, त्याबद्दल परमेश्वराचे खूप खूप आभार.”

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!