दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न*

*वलखेड येथे मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न*
परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन, वोक्हार्ट फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेड आणि ग्रामपंचायत वलखेड यांच्या सहकार्याने आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरात वलखेड व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण २६०नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. शिबिरात जनरल तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, दंतरोग तपासणी,रक्त तपासणी अशा विविध सेवा तसेच मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. मोफत चष्मे वाटप करण्यात आले.उपस्थित महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.
शिबिरामध्ये आरोग्य विषयक जनजागृती सत्र घेण्यात आले. ज्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली.
या प्रसंगी ग्रामपंचायत वलखेड सरपंच हिरामण पाटील, माजी.सरपंच विनायक शिंदे, केशव मेधने तंटामुक्ती अध्यक्ष, लिपिक काशिनाथ गायकवाड, पत्रकार नारायण राजगुरू, ग्रामपंचायत कर्मचारी रोशन साडे, अर्जुन शेवरे आशा सेविका, अंगणवाडी सेविक आरोग्य उपकेंद्र वलखेड येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर कृष्ण उघडे यांनी शिबिरास भेट दिली.
शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी वोक्हार्ट फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेडचे प्रकल्प समन्वयक कृष्णा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरामध्ये आपली सेवा बजावणारे तज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचारी :
👨⚕️ जनरल तपासणी – डॉ. संजय देशमुख, डॉ. ओम कदम
👩⚕️ स्त्रीरोग तज्ञ – डॉ. परिमल चव्हाण
👶 बालरोग तज्ञ – डॉ. रुपाली मॅडम
👁️ नेत्र रोग तज्ञ – डॉ सुरेश थोरे
🦷 दंतरोग तज्ञ – डॉ. कस्तुरी दायमा
💊 फार्मासिस्ट – स्नेहा जाधव
🧪 लॅब टेक्निशियन – ज्योती मोगल
👩⚕️ सिस्टर – पुष्पा शार्दुल
💁♀️ रिसेप्शन – ज्योती नेहरे, धनश्री बोरस्ते, ललिता धुळे
या शिबिरामुळे वलखेड व परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढली असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.



