# रस्ते की खड्डे? सुरगाण्यात विकासाचा नकाशाच उलटा; आदिवासी जनतेचा संयम संपत चालला!” – आवाज जनतेचा
संपादकीय

रस्ते की खड्डे? सुरगाण्यात विकासाचा नकाशाच उलटा; आदिवासी जनतेचा संयम संपत चालला!”

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

 

“रस्ते की खड्डे? सुरगाण्यात विकासाचा नकाशाच उलटा; आदिवासी जनतेचा संयम संपत चालला!”

सुरगाणा तालुक्याची ओळख आदिवासीबहुल तालुका म्हणून असली, तरी आजही येथील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्ते, वीज आणि आरोग्य सेवांचा अभाव यामुळे आदिवासी बांधवांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. विशेषतः तालुक्यातील अनेक प्रमुख आणि ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे.

रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, अनेक ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे, अनेक दुर्गम भागांमध्ये वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम असून, आरोग्य सुविधांचाही अभाव जाणवत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे आदिवासी भागाच्या विकासाच्या घोषणा केवळ कागदावरच असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून वीज व आरोग्य सुविधा सक्षम कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!