आपला जिल्हाविशेष वृतान्त
आंबेपाडा आश्रमशाळेचे पावरी नृत्य विभाग स्तरावर प्रथम
१५ नोव्हेंबरला नागपूर येथे राष्ट्रपतींसमोर होणार सादरीकरण

आदिवासी जनजातीय गौरव दिनानिमित्त आयोजित संस्कृती स्पर्धेत आंबेपाडा (ता. सुरगाणा) येथील किसन भोंडवे प्राथमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे पावरी नृत्याने तालुका, प्रकल्प आणि विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला नागपूर येथे नृत्याचे राज्यस्तरीय सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहे.
तालुकास्तर स्पर्धा माणी, प्रकल्पस्तरीय स्पर्धा कळवण तर विभागीय स्पर्धा नाशिक येथे एकलव्य स्कूलमध्ये पार पडल्या. या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यासाठी शाळेतील शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून आदिवासी परंपरा, संस्कृती आणि जीवनशैलीचे दर्शन घडवले आहे. यासाठी शाळेचे शिक्षक ललित राऊत यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांना प्राथमिक मुख्याध्यापक देवराम गांगुर्डे आणि माध्यमिक मुख्याध्यापक महेंद्र ठाकरे, दत्तू मोरे, प्रकाश वाघ, सुनील देशमुख, मनोज पाटील, त्रिवेणी जाधव, माया भोंडवे, सुूदेश ठाकरे, भारती देशमुख, प्रभाकर खिरारी, रमेश गायकवाड अमोल चव्हाण यांनी सहकार्य केले.
—
फोटो
बोरगाव : नागपूर येथे राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेसाठी निवड झालेला सुरगाणा तालुक्यातील आंबेपाडा (हस्ते) येथील आश्रमशाळेचा संघ.



