परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन, वोक्हार्ट फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेड तसेच ग्रामपंचायत करंजवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महा आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरात करंजवण व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण २०६ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. शिबिरात जनरल तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, दंतरोग तपासणी तसेच रक्त तपासणी अशा विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिरामध्ये आरोग्य विषयक जनजागृती सत्र घेण्यात आले. तसेच माध्यमिक विद्यालय करंजवण येथील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली.
या प्रसंगी ग्रामपंचायत करंजवणचे सरपंच संदीप गांगोडे, उपसरपंच प्रकाश देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच माध्यमिक व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा येथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर देशमुख सर यांनी शिबिरास भेट दिली.
शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी वोक्हार्ट फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेडचे प्रकल्प समन्वयक कृष्णा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरामध्ये आपली सेवा बजावणारे तज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचारी :
⚕️ जनरल तपासणी – डॉ. संजय देशमुख, डॉ. ओम कदम
⚕️ स्त्रीरोग तज्ञ – डॉ. परिमल चव्हाण
बालरोग तज्ञ – डॉ. रुपाली मॅडम
️ नेत्र रोग तज्ञ – सुरेश थोरे
दंतरोग तज्ञ – डॉ. कस्तुरी दायमा
फार्मासिस्ट – स्नेहा जाधव
लॅब टेक्निशियन – कैलास वसावे, ज्योती मोगल
⚕️ सिस्टर – पुष्पा शार्दुल
♀️ रिसेप्शन – ज्योती नेहरे, धनश्री बोरस्ते, ललिता धुळे
या शिबिरामुळे करंजवण व परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढली असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.