जागतिक महिला दिनानिमित्त राशा ग्रामपंचायतीकडून कापडी पिशव्यांचे वाटप
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

जागतिक महिला दिनानिमित्त राशा ग्रामपंचायतीकडून कापडी पिशव्यांचे वाटप
सुरगाणा तालुक्यातील राशा ग्रामपंचायतीत दिनांक ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक कुटुंबाला कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकचा वापर कमी करून कापडी पिशव्यांचा वापर वाढावा, तसेच स्वच्छ आणि पर्यावरणपूरक गाव घडवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत राशाच्या वतीने प्रति कुटुंब एक कापडी पिशवी देण्यात आली. कार्यक्रमाला मा. सरपंच सिताराम हरी भोये, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर वाघेरे, पोलीस पाटील हसमुख वाडेकर, कैलास देशमुख, सौ. योगिता राऊत तसेच सौ. हिरा गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करत पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून कार्यक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.



