# सुरगाण्यात स्ट्राॅबेरी उत्पन्नात सात वर्षात सात पट वाढ. – आवाज जनतेचा
कृषी

सुरगाण्यात स्ट्राॅबेरी उत्पन्नात सात वर्षात सात पट वाढ.

मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाण्यात स्ट्राॅबेरी उत्पन्नात सात वर्षात सात पट वाढ.

नाशिक जिल्हा द्राक्षपंढरी, कांदा उत्पादनाची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळख आहे. त्याच्या स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या सुरगाणा तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. गुलाबी रंगाची गोड, आंबट चवीच्या स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडीबरोबर बहरायला सुरुवात होते. महत्त्वाचे म्हणजे सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने स्ट्रॉबेरीची मागणी मोठ्या प्रमाणात असते.


या आहेत प्रमुख जाती
विंटरडाऊन, सेल्वा, राणी, इंटर डाऊन, स्वीट गोल्ड, नाभिया, स्वीट चार्ली, एस ए, कामरोजा, इंटरप्लस, चांडलर, एससी, एस वन या प्रमुख जाती आहेत.

प्रमुख बाजारपेठा
दोन किलो पॅकिंगमध्ये मुंबई, सुरत, नवसारी, वघई, अहमदाबाद, दिल्ली, वाझदा, पुणे, औरंगाबाद, भरुच, बडोदा, वलसाड, धरमपूर येथे पाठवले जातात. अंदाजे प्रत्येक दोन किलो पॅकला १५० ते २०० रुपये दर मिळतो.

सुरगाणा तालुक्यातील पूर्वी भात, वरई, नागली, खुरासणी ही पिके घेतली जात होती. पारंपारिक शेतीला फाटा देत नगदी पीक म्हणून स्ट्रॉबेरी पिकाकडे कल वाढला आहे.
—-
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, घागबारी, चिखली, वटाबारी, उंबरपाडा, घोडांबे, पोहाळी, पासोडी, पायरपाडा, हिरीडपाडा, खरुडे, साजोळे, रोटी, नागशेवडी, शिंदे (दि), मोहपाडा, बुबळी या भागात घेतले जाते.

या शेतीला वातावरण
स्ट्राॅबेरीला थंड हवामान लागते. असेच पोषक वातावरण या भागात असल्याने उत्पादन चांगले मिळते.

एकरी खर्च
साधारणत: एक एकर स्ट्राबेरीच्या लागवडीसाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. एकरी उत्पन्न अडीच ते तीन लाख रुपये मिळते.

रोपांची किंमत
महाबळेश्वर येथून रोपे आणली जातात. एका रोप ८ ते १० रुपयास मिळते.


असे वाढतेय स्टाबेरी क्षेत्र (एकर)
२०१७-१८ – ७५
२०१८-१९ – ८३
२०१९-२० – २२५
२०२०-२१ – ३५०
२०२१-२२ – ४००
२०२२-२३ – ४३०
२०२३-२४-४४०
२०२४-२५-४९०

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!