अलंगुण आश्रम शाळेचा महेंद्र गायकवाड महाराष्ट्राच्या खोखो संघात….*
परभणी येथे पार पडलेल्या 14 वर्ष वयोगट महाराष्ट्र राज्य शालेये खो- खो स्पर्धेत आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून या शिक्षण संस्थेच्या *अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगून* तालुका सुरगाणा येथील इयत्ता 8 वीत शिकत असलेला विध्यार्थी *महेंद्र भास्कर गायकवाड राहणार तळपाडा हातरुंडी* याची 14 वर्ष वयोगट शालेय खो – खो स्पर्धेच्या *महाराष्ट्र राज्य संघात* निवड झाली आहे. अलंगून आश्रम शाळेत शिक्षण आणि खेळवर लक्ष केंद्रित केल्याने आज त्याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. शालेये क्रीडा स्पर्धेत खेळतांना त्याने उत्कृष्ठ बचाव आणि संरक्षण करून संघाला विभाग पातळी पर्यन्त यश मिळवून दिले. परभणी येथील विभागीय क्रीडा स्पर्धेतही त्याने आपल्या आक्रमक व प्रभावी खेळ कायम ठेवल्याने तो यशस्वी झाला आहे.
महेंद्र गायकवाड याची महाराष्ट्र राज्याच्या खोखो संघात निवड आणि नॅशनल खेळाडूचा सन्मान मिळाल्याने, आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कॉ जे पी गावित, संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी महेंद्र आणि क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
शिक्षणाबरोबर खोखो खेळाचे धडे गिरवून, शिक्षण संस्थेचे, आश्रम शाळेचे, सुरगाणा तालुक्याचे, नाशिक जिल्ह्याचे नाव रोशन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…..