# सुरगाण्यात २१ जानेवारी रोजी ० ते १८ वयोगटासाठी मोफत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे  – आवाज जनतेचा
आरोग्य व शिक्षण

सुरगाण्यात २१ जानेवारी रोजी ० ते १८ वयोगटासाठी मोफत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे 

सुरगाण्यात २१ जानेवारी रोजी ० ते १८ वयोगटासाठी मोफत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे

० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व विद्यार्थ्यांसाठी मोफत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर दि. २१ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी ग्रामीण रुग्णालय, सुरगाणा येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नाशिक जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये हर्निया (अंडकोश व बेंबीजवळ फुगवटा), हायड्रोसील (अंडकोशाजवळ सूज), फायमोसिस (लघवीच्या नळीची जागा कमी/फुगणे), डोळ्यात तिरळेपणा, टंग टायड (जीभ चिटकलेली), विविध प्रकारच्या गाठी, अर्श (मुळव्याध), भगंदर, अपेंडिक्स तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.
गरजू बालक व विद्यार्थ्यांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा आणि वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
संपर्क :
डॉ. प्रविण पवार — ९४०५५३६२१५, ७०६६२५१२५३

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!