म्हैसखडक येथे ५२ वे अखंड हरिनाम सप्ताह; दत्तजयंतीनिमित्त भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन*
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

म्हैसखडक येथे ५२ वे अखंड हरिनाम सप्ताह; दत्तजयंतीनिमित्त भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन*
श्री गुरुदेव दत्त मंदिर, म्हैसखडक (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे श्री गुरुदत्तात्रेय जन्मोत्सवानिमित्त ५२ वा अखंड हरिनाम सप्ताह वै. हभप बासुबाबा उर्फ लक्ष्मणबाबा यांच्या कृपा-आशीर्वादाने तसेच महाराष्ट्र–गुजरात–डांग येथील जनताजनार्दनांच्या सहकार्याने मंगळवार, २ डिसेंबर २०२५ पासून ५ डिसेंबर २०२५ पर्यंत भक्तिभावाने सुरू होत आहे.
सप्ताहात दररोज “जय जय रामकृष्ण हरी” या गजरात प्रार्थना, ग्रंथवाचन, हरिपाठ, काकडा आरती, कीर्तन आणि संगीतमय भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. रात्री ९ ते ११ दरम्यान होणारी कीर्तनसेवा भक्तिप्रेमींना अध्यात्मिक ऊर्जा प्रदान करणार आहे. तसेच दररोज सकाळ व दुपारी अन्नदान सेवा सतत सुरू राहील.
४ डिसेंबर रोजी दत्तजयंतीनिमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप नाथ महाराज यांचे कीर्तन होईल व त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
५ डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने होणार असून, सर्व साधक-भाविकांनी या अमृतमय हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शक हभप नाथ महाराज तसेच श्री गुरुदेव दत्त मंदिर, म्हैसखडक येथील समस्त साधक मंडळी यांनी केले आहे.



