संपादकीय
बातमीची दखल; पळसन तलाठी कार्यालयाच्या कामात सुधारणा
ठेकेदाराकडून निकृष्ट भाग दुरुस्त, पळसन ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना चौधरी ॲक्शन मोडवर

बातमीची दखल; पळसन तलाठी कार्यालयाच्या कामात सुधारणा
ठेकेदाराकडून निकृष्ट भाग दुरुस्त, पळसन ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना चौधरी ॲक्शन मोडवर
पळसन येथील तलाठी कार्यालयाच्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाने दखल घेतली आहे. पळसन ग्रामपंचायत च्या सरपंच रंजना चौधरी यांनी संबंधित ठेकेदार यास खडेबोल करुन काम दुरुस्त करून घेतली. तसेच ठेकेदारास सांगितले की यापुढे कामात त्रुटी आढळल्यास वरीष्ठ अधिकारी यांच्या कडून चौकशी करण्यात येईल अशा सुचना देण्यात आल्या.. निकृष्ट साहित्य काढून दर्जेदार साहित्याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी मात्र कामावर सतत देखरेख ठेवण्याची मागणी कायम ठेवली आहे.