सुरगाण्यातील उंबरठाणजवळ ४ लाखांचे मद्य जप्त
चारचाकी वाहनासह १० लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त

सुरगाण्यातील उंबरठाणजवळ ४ लाखांचे मद्य जप्त
चारचाकी वाहनासह १० लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त
लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण – सुरगाणा राेडवरील अंबाठा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ४ लाख १५ हजारांच्या मद्यासह चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले.
परराज्यातून अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती बोरगाव येथील विभागाच्या पथकाला मिळाली होती. नाशिक विभागाचे अधीक्षक संतोष झगडे व उपअधीक्षक अ. सु. तांबारे मार्गदर्शनाखाली १२ जानेवारीस सुरगाणा – उंबरठाण रस्त्यावरील आंबाठा शिवारात वाहनतपासणी सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान चारचाकी वाहनाची (जीजे १५ सीके १४२३) थांबवत तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मद्याचे ३७ बॉक्स आढळले. या प्रकरणी वाहनचालक सुनील रामजीवन खिलेरी (१९, रा. पवारोकी ढाणी, जि. बारमेर, राजस्थान) तसेच इतर साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईत ४ लाख १५ हजाराच्या मद्यासह संशयितांकडील चारचाकी वाहनासह मोबाइल जम्त करण्यात आला. विभागाने एकूण १० लाख ७९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत कळवण विभागाचे निरीक्षक सी. एच. पाटील, बोरगावचे दुय्यम निरीक्षक विठ्ठल बाविस्कर, दुय्यम निरीक्षक महेंद्र कोडे, सुनील पाटील, गोरख गरुड, अजय बगर, तेजस कसबे यांनी भाग घेतला. या गुन्ह्याचा तपास विठ्ठल बाविस्कर करत आहे.


