खोकरी प्रिमियम लीगचे खिर्डी संघास विजेतेपद

खोकरी प्रिमियम लीगचे खिर्डी संघास विजेतेपद
¢
बोरगाव : लक्ष्मण बागुल
तालुक्यातील खोकरी प्रिमीयम लीग क्रिकेट स्पर्धेत खिर्डी संघाने विजेतेपदावर नाव कोरले. पाच दिवस चाललेल्या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या खिर्डी येथील देवकणसरा संघाला ५१ हजार रुपये रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह देत गौरवण्यात आले. स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान काटीपाडा येथील पवन वॉरियर्स संघाने पटकावला. त्यांना ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. अलंगुण येथील आदर्श इलेव्हन संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला. २१ हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. स्प र्धेचा समारोप व बक्षीस वितरण रामचंद्र गांगुडे, धूम यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कार मनोज महाले, उत्कृष्ट गोलंदाज कृष्णा राऊत, उत्कृष्ट चंदू गाढवे यांना विशेष बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन तानाजी वाघमारे, तुषार धूम, बाळू धूम, रामदास धूम, महिंद्रा धुळे यांनी केले होते.



