सुरगाणा शहरात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांनी विविध पारंपरिक वेषभूषांमध्ये उपस्थित राहून संस्कृतीचे दर्शन घडवले. भगवान बिरसा मुंडा चौकात आयोजित प्रमुख कार्यक्रमात भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर भाऊ चव्हाण यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून नारळ फोडत वंदन केले.
यावेळी विर बिरसा मुंडा पथक करजांळी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी आश्वासन दिले की वै. मा. खा. हरिश्चंद्र चव्हाण साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केला जाईल. भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम साहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या चिरंजीवांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “साहेबांचे राहिलेले काम मी म्हणजेच साहेबच पूर्ण करतील,” असे आश्वासन देत त्यांनी उपस्थित आदिवासी बांधवांचा विश्वास वाढवला.
कार्यक्रमास सुरगाणा नगरपंचायतचे भाजपा नगरसेवक व भावी नगराध्यक्ष विजय धनराज कानडे, भावी पंचायत समिती सदस्य पंकज चव्हाण तसेच सुरगाणा शहरातील विविध समाजातील नागरिक आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम सुरगाणा शहरात पाहायला मिळाला.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.