मुळवड ग्रामपंचायत पैकी कोटंबी गावात ‘वेल्स ऑन व्हिल्स’कडून ६१ जलचक्रींचे वाटप

मुळवड ग्रामपंचायत पैकी कोटंबी गावात ‘वेल्स ऑन व्हिल्स’कडून ६१ जलचक्रींचे वाटप
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळवड ग्रामपंचायत अंतर्गत कोटंबी गावाला वेल्स ऑन व्हिल्स या सामाजिक संस्थेच्या वतीने ६१ जलचक्रींचे वाटप करण्यात आले. उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई आणि पाणी साठवणुकीस मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास वेल्स ऑन व्हिल्स सामाजिक संस्थेचे नारायण गभाले, संकेत बिडगर, शाम धनगरे, ओम भालेराव, प्रद्युम्न सांबारे उपस्थित होते. तसेच गावाचे पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक काटे सर, बंगाड सर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
जलचक्रींच्या माध्यमातून पाणी साठवण आणि वापर अधिक सुलभ होणार असून महिलांना व शेतकऱ्यांना दैनंदिन कामात मोठी मदत होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत वेल्स ऑन व्हिल्स संस्थेने राबविलेला हा उपक्रम ग्रामस्थांनी स्वागतार्ह व उपयुक्त असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी वेल्स ऑन व्हिल्स सामाजिक संस्थेच्या जलपरिषद मित्र परिवार मुळवड, कोटंबी यांच्या वतीने संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.



