प्रथम इन्फोटेक फाउंडेशन आणि एलटीआय माईंड ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने सुरगाणा तालुक्यात एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील १५ जिल्हा परिषद शाळांमध्ये “स्टेम लर्निंग” (STEM Learning) उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणे हा आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकता यावे, यासाठी ४० लॅपटॉप शिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तसेच, या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “इको व्हॅन” ला शैक्षणिक ब्रँडिंग करून विशेष दळणवळणासाठी सज्ज करण्यात आले आहे. या व्हॅनच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये कार्यक्रमाची माहिती, तंत्रज्ञान प्रदर्शन आणि शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि गावकऱ्यांमध्ये शिक्षण व तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता आणि उत्साह वाढला आहे. प्रथम इन्फोटेक फाउंडेशन आणि एलटीआय माईंड ट्री यांच्या या आगळ्या-वेगळ्या प्रयत्नामुळे ग्रामिण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत निश्चितच सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.