
*नामदेव पाडवी यांना “राज्यस्तरीय जीवनगौरव” पुरस्कार जाहीर*
महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र (आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त) हिंदी मराठी पत्रकार संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेचे जनक डॉ बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाबद्दल दैनिक देशदूत पत्रकार नामदेव पाडवी यांना “राज्यस्तरीय जीवनगौरव” पुरस्कार जाहीर केला आहे, ही एक महत्त्वाची बातमी असून, या पुरस्काराने त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला जातोय. हा पुरस्कार त्यांच्या दीर्घ आणि उत्कृष्ट कारकिर्दीचा सन्मान आहे.
दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी मलकापूर, बुलढाणा येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून स्वागत केले आहे.



