कनाशीत मटका-जुगार अड्ड्यावर छापा; दोघे अटकेत, मुख्य आरोपी फरार
ग्रामीण पोलिस पथकाने कनाशी शिवारातील पिंपळा रोडलगत हुडी डोंगर परिसरात सुरू असलेल्या मटका-जुगार अड्ड्यावर धाड टाकत दोन जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ही कारवाई महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत करण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून ५,२०० रुपयांची रोकड, अंक-आकडे लिहिलेली पावती पुस्तिका, निळ्या रंगाचा कार्बन व एक पेन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्याद पोलिस हवालदार गिरीश दिनकर निकुंभ यांनी दाखल केली असून, अटक करण्यात आलेले आरोपी मोहन भीमराव वानखेडे (वय ४२, रा. खडकवन, ता. कळवण) आणि संदीप केशव बोरसे (वय ३६, रा. कनाशी, ता. कळवण) हे दोघे “मिलन क्लोज” या नावाने मटका-जुगार खेळत व खेळवत होते.या प्रकरणातील मुख्य आरोपी हा फरार असूनपोलीस त्याचा शोध घेत आहेत
सदर कारवाई पोलिस हवालदार आर. जी. वसावे यांच्या पथकाने केली असून तपास पोलिस उपनिरीक्षक ए. एम. गायकवाड करीत आहेत.