आपला जिल्हाक्राईम स्टोरी
धान्याचा काळाबाजार उघडकीस; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा तालुक्यात धान्याच्या अवैध वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकार सुरगाणा उंबरठाण रस्त्यावरील मोतीबाग येथे वाहन ताब्यात घेण्यात आले होते. यातील आरोपीने आपल्या ताब्यातील आयशर गाडी (क्र. MH 15 JC 6096) मधून धान्याची वाहतूक करताना बाजार पावती आणि प्रत्यक्ष मुद्देमाल यामध्ये मोठी तफावत असल्याचे आढळून आले.
या घटनेतील आरोपी संतोष निंबा बागुल (४३, रा. सुरगाणा) हा फरार झाला आहे.
तपासात सदर धान्य काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्रीसाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात वाहनासह एकूण साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सुरगाणा तालुक्यात धान्याने भरलेला ट्रक तहसीलदारांनी ताब्यात घेतला असून, या ट्रकमधून संशयास्पदरीत्या धान्य वाहतूक केली जात असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. या प्रकरणात तहसीलदार रामजी राठोड तपास करत असून, सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित व्यापाऱ्याची चौकशी सुरू होती.या घटनेमुळे सुरगाणा तालुक्यातील जुन्या धान्य घोटाळ्याची पुन्हा चर्चा रंगली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही २०१४ मध्ये सुरगाण्यात मोठा धान्य घोटाळा उघडकीस आला होता, ज्यात शा
कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, यांनी सांगितले की, “धान्य वाहतुकीसंदर्भात माहिती मिळताच तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पंचनामा करून अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यास सांगितले आहे.”
तर रामजी राठोड, तहसीलदार, सुरगाणा, यांनी सांगितले की, “उंबरठाण येथे एका ट्रकमधून धान वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ट्रक ज्या व्यापाऱ्याचा आहे त्याची चौकशी सुरू असून, तपासानंतर संपूर्ण माहिती समोर येईल.



