आपला जिल्हा
बोरगाव येथे धैर्यशील राव पवार विद्यालयात मतदान जनजागृती उपक्रम
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल
बोरगाव येथे धैर्यशील राव पवार विद्यालयात मतदान जनजागृती उपक्रम
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील धैर्यशील राव पवार विद्यालयात शिक्षकांच्या पुढाकारातून मतदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व समजावून देताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान करण्याचा अनुभवही देण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मॉक मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यामुळे निवडणूक प्रक्रिया, मतदार नोंदणी आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय वाघ, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



