बोरगाव येथे बॅंक ऑफ बडोदा एटीएम सेवेला सुरुवात
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे बॅंक ऑफ बडोदा शाखेच्या एटीएम मशीनचे लोकार्पण करण्यात आले असून नागरिकांसाठी ही सेवा सुरू झाली आहे. एटीएम सुरू झाल्याने स्थानिकांना आता रोख रक्कम काढण्यासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही.
या सुविधेमुळे बोरगाव परिसरातील शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना २४ तास बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत. रोख रक्कम काढणे, खाते शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट आदी सुविधा या एटीएमद्वारे मिळणार आहेत.
एटीएम सुरू झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून बॅंक ऑफ बडोदाने ग्रामीण भागात सेवा विस्तार केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी बॅक ऑफ बडोदा बोरगाव शाखेचे मॅनेजर मोतिराम चव्हाण यांनी प्रयत्न केले.