आपला जिल्हासामाजिक
नाशिकमध्ये ‘नारी शक्ती सन्मान सोहळा 2025’ संपन्न; सौ.सिता थविल (राठोड) याचा सन्मान.
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सहकार महर्षी उत्तमराव ढिकले फाऊडेशन ट्रस्टतर्फे ‘नारी शक्ती सन्मान सोहळा २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. या समारंभात शासकीय सेवेत चांगले कार्य केल्याबद्दल सौ. सिता थविल (राठोड) यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी आमदार राहुल (भाऊ) ढिकले व माजी उपमहापौर गुरुजित बग्गा या मान्यवर व्यक्तींनी प्रमुख उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात ठिकानी सिता थविल यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. शासकीय क्षेत्रात महिला कर्तृत्वाला ओळख देणे हे या सन्मानाचे मुख्य उद्देश होते, असे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
सन्मानित झालेल्या सिता थविल यांनी या गौरवाचे श्रेय आपल्या कुटुंबीयांना, सहकारी अधिकाऱ्यांना आणि समर्थन देणाऱ्या सर्वांना दिले. त्यांनी या सन्मानाने समाजातील इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे समाजात नारी शक्तीचे महत्त्व पुन्हा एकदा पुढे आले.
फोटो: आमदार राहुल ( भाऊ) ढिकले याच्या हस्ते नारी शक्ती सन्मान 2025 स्विकारताना सौ. सिता थविल (राठोड) समवेत माजी उपमहापौर गुरुजित बग्गा आदि



