मोहपाडा आश्रमशाळेच्या चार विद्यार्थ्यांना BASF शिष्यवृत्ती प्रदान…..*

*मोहपाडा आश्रमशाळेच्या चार विद्यार्थ्यांना BASF शिष्यवृत्ती प्रदान…..*
सह्याद्री फार्म्स येथे आयोजित **BASF Kids Lab** अंतर्गत झालेल्या **BASF Drawing Competition** मध्ये मोहपाडा आश्रमशाळेतील काही विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडक विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, शालेय किट आणि STEM किट व कु. हर्षाली गायकवाड व कु. वंदना गायकवाड यांना प्रत्येकी 18 हजार रुपये शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. शुक्रवार, दी. ९ जानेवारी २०२६ दुपारी १२.०० वाजता CMCS कॉलेज, गंगापूर रोड, प्रसाद मंगल कार्यालयाजवळ, नाशिक येथे सदर कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमासाठी BASF कंपनीचे प्रतिनिधी मा. तृप्ती कदम, संस्थेचे सरचिटणीस मा. नितीनजी ठाकरे साहेब, शिक्षणाधिकारी मा. भास्कर ढोके साहेब, मविप्रच्या माजी विद्यार्थी संघाचे डॉ. धनंजय चव्हाण, मा. सचिन पाचोरकर शाळेचे मुख्याध्यापक संतोष गौळी, पदवीधर शिक्षक श्री. सतीश शेळके उपस्थित होते.


