आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त बाऱ्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, बाऱ्हे येथील विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविले.
या उपक्रमात ग्रुप ग्रामपंचायत बाऱ्हे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते देविदास गावीत, ग्रामीण रुग्णालय बाऱ्हेचे केदार झिरवाळ, योगेश जाधव, माजी उपसरपंच त्र्यंबक ठेपणे, भास्कर वार्डे, गोरख महाले, जगदीश पाडवी, अशोक महाले आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेमुळे परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संदेश देण्यात आला असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण झाली.
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.