विशेष वृतान्त
उंबरठाण-बर्डा परिसरात बिबट्याचा वावर; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

उंबरठाण-बर्डा परिसरात बिबट्याचा वावर; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
उंबरठाण बर्डा परिसरात भर दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास बाभूळपाडा माळरानाजवळ तब्बल दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे. बर्डा, गाळबारी, चिंचमाळ या गावांमधून आश्रम शाळा करंजूल (क), गुही, चिंचला व उंबरठाण या शाळांमध्ये दररोज ३ ते ४ किलोमीटर पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
या संदर्भात मधुकर पवार, महारू धुळे, केशव धुळे तसेच गाळबारी येथील शेतकरी बाबुराव गवळी यांनी माहिती दिली. सततचा वावर व दुपारच्या वेळेसही बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.


