
*मोहपाडा आश्रमशाळेचे दोन संघराज्य स्तरावर*
16 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ येथे ‘आदिवासी विकास विभाग’ अंतर्गत नाशिक-विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतील व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात सात प्रकल्पातील संघ सहभागी होते. आश्रम शाळा मोहपाडा ता. सुरगाणा येथील 14 वर्षातील मुले व 19 वर्षातील मुली या दोन संघांनी सर्व प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारत प्रथम क्रमांक मिळवला. दोन संघांची (एकूण 22 खेळाडू) अमरावती येथे होणाऱ्या ‘राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा’ साठी निवड झाली. 17 वर्षातील मुली व्हॉलीबॉल संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच 17 वर्षातील मुले व 19 वर्षातील मुले संघांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी संघातील सर्व विद्यार्थ्यांना नाशिक विभागाचे अपर आयुक्त मा. पावरा साहेब, यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, कळवण प्रकल्प अधिकारी मा. जानकर साहेब व इतर मान्यवरांनी ट्रॉफी देऊन सन्मानित केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. कैलास चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक यांचे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सेवक वर्ग यांनी अभिनंदन केले.



