समता शिक्षक परिषदेतर्फे 28 ला आदर्श शिक्षकांचा गौरव
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे 28 नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त संघटनेतर्फे गेले ३० वर्षापासून शैक्षणिक कार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना गौरवण्यात येणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप, भास्कर कनोज, मनपा प्रशासन अधिकारी मीता चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लब गंजमाळ येथे हा गुणगौरव सोहळा होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रल्हाद लुल्लेकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमापूर्वी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती आयोजक जिल्हाध्यक्ष वाल्मिक कापडणे, कार्याध्यक्ष देवेंद्र वाघ, सरचिटणीस विजय जगताप, कोषाध्यक्ष नवनाथ आढाव यांनी दिली.
यांचा होणार सत्कार
अभिमान बहिरम (चिंचपाडा, सुरगाणा), संगीता आढाव (मनपा, नाशिक), जिजाबाई मोरे (खेडगाव, दिंडोरी), सुनीता निकुंभ (गंगाम्हाळुंगी, नाशिक) बापू धाकतोडे (कुंदेवाडी, सिन्नर), कल्पना गरुड (धामणगाव, इगतपुरी), संतोष गांगुर्डे (उगाव, निफाड), सुवर्णा उनवणे (माडसांगवी, नाशिक), अनिल चव्हाण (दोनवाडे, पेठ), मेघा सदावर्ते ( शिवाजीवाडी, नाशिक), संगीता अहिरे (तोरंगण, त्र्यंबकेश्वर), पंडित महाले (सडकपाडा, सटाणा), अनिल शिनकर (वराडी, चांदवड), सुंदरबाई पवार (दरीभणगी, कळवण), शंकर अहिरे (नांदूर, येवला) भारती मोराणे (डोंगरगाव, देवळा), ज्योती कर्डिले (सामनगाव, नाशिक), अरुण भामरे (वंजारवाडी, नांदगाव)